
राज्यात चार वर्षांमध्ये १० हजारांवर हत्या -युपी,बिहारनंतर पुरोगामी महाराष्टÑाचा क्रमांक - मे २०१५ पर्यंत नागपुरात ४५९ हत्यांची नोंद - ‘नॅशनल क्र ॉईम रेकॉर्ड ब्युरो’ची आकडेवारी पुरोगामी महाराष्टÑात दाभोळकर,पानसरे सारख्या विचारवंतांची हत्या होते मात्र, त्यांच्या मारेकºयांना अटक करण्यात पोलिस यंत्रणेला अद्याप पर्यंत यश येत नाही. या दशकाच्या सुरवातीचा विचार केला तर या विचारवंताच्या हत्या प्रामुख्याने समोर येतात. मात्र, दशकाच्या सुरवातीच्या चार वर्षांत पुरोगामी म्हणवल्या जाणाºया महाराष्टÑात तब्बल १० हजार ७१२ हत्या झाल्या आहेत. हे ऐकूण जरा तुम्हाला नवल वाटेल मात्र, ऐकावे ते नवल अस बोलल्या शिवाय तुम्ही राहणार नाही. महाराष्टÑात गुन्हेगारी एवढी वाढली आहे का असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्याची उपराजधानी नागपुरात या चार वर्षात तब्बल ४२४ हत्यांची आकडेवारी समोर आली आहे. गुन्हेगारीचा वाढता ग्राफ प्रसारमाध्यमांच्या आधारे आपल्या समोर येत असतो. अश्यातच पुरोगामी महाराष्टÑ किमान युपी, बिहार पेक्षा जास्त पुढारले आहे अस मरा...