राज्यात चार वर्षांमध्ये १० हजारांवर हत्या 

-युपी,बिहारनंतर पुरोगामी महाराष्टÑाचा क्रमांक 

- मे २०१५ पर्यंत नागपुरात ४५९ हत्यांची नोंद
- ‘नॅशनल क्र ॉईम रेकॉर्ड ब्युरो’ची आकडेवारी
  पुरोगामी महाराष्टÑात दाभोळकर,पानसरे सारख्या विचारवंतांची हत्या होते मात्र, त्यांच्या मारेकºयांना अटक करण्यात पोलिस यंत्रणेला अद्याप पर्यंत यश येत नाही. या दशकाच्या सुरवातीचा विचार केला तर या विचारवंताच्या हत्या प्रामुख्याने समोर येतात. मात्र, दशकाच्या सुरवातीच्या चार वर्षांत पुरोगामी म्हणवल्या जाणाºया महाराष्टÑात तब्बल १० हजार ७१२ हत्या झाल्या आहेत. हे ऐकूण जरा तुम्हाला नवल वाटेल मात्र, ऐकावे ते नवल अस बोलल्या शिवाय तुम्ही राहणार नाही. महाराष्टÑात गुन्हेगारी एवढी वाढली आहे का असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्याची उपराजधानी नागपुरात या चार वर्षात तब्बल ४२४ हत्यांची आकडेवारी समोर आली आहे.
   गुन्हेगारीचा वाढता ग्राफ प्रसारमाध्यमांच्या आधारे आपल्या समोर येत असतो. अश्यातच पुरोगामी महाराष्टÑ किमान युपी, बिहार पेक्षा जास्त पुढारले आहे अस मराठी माणूस मोठ्या अभिमाने सांगत असतो मात्र, हत्या बाब उत्तर प्रदेश तसेच बिहारच्या खालोखाल देशात महाराष्टÑाचा तिसरा नंबर लागतो. केंद्र सरकाच्या नॅशन क्रॉईम रेकॉर्ड ब्युरो ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. दशकाच्या सुरवातीच्या २०११ ते २०१५ या वर्षात महाराष्टÑात हत्याची संख्या दहा हजारांच्या पार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे प्रमाण जरी उत्तर प्रदेश व त्याच्या खालोखाल असलेल्या बिहार राज्या पेक्षा कमी असले तरी पुरोगामी राज्य म्हणून ज्याची देशात ओळख आहे अश्या राज्याच्या कायद्या तसेच सुव्यवस्थेचे पुरते वाभाडे काढणारी ही आकडेवारी आहे. गेल्या चार वर्षांचा उत्तर प्रदेशातील हत्येचा ग्राफ बघितला तर चार वर्षांत युपीत १,४६० दिवसांत तब्बल २० हजार ११४ हत्या झाल्या, त्या खालोखाल बिहार राज्यात १३ हजार ६०८ हत्या झाल्या. महाराष्टÑाच्या तुलनेत हे प्रमाण जरी जास्त असले तरी उत्तर प्रदेश व बिहार राज्याची गुन्हेगारी पार्श्वभुमि तसेच लोकसंख्या विस्तार यामुळे हे प्रमाण जास्त आहे असे अभ्यासकांचे मत आहे. मात्र, समोर आलेल्या या हत्यांच्या आकडेवारीमुळे राज्यात कायद्या व सुव्यवस्था आहे की नाही या संदर्भात गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रशासित प्रदेशात होण्याºया हत्येच्या आकडेवाडीचा विचार केला असता, देशाची राजधानी दिल्लीचा प्रथम क्र मांक लागतो. दिल्ली दरवर्षी किमान ५०० जणांच्या हत्या होतात  असे या आकडेवाडीनुसार समोर आले आहे हे विशेष. २०११ ते १४ च्या आकडेवाडीचा एकत्रित विचार केला असता हे प्रमाण २ हजार १५८ एवढे आहे. तर राज्याची उपराजधानी नागपूरात या चार वर्षात एकू ण ४२४ लोकांच्या हत्या झाल्याची आकडेवाडी गुन्हे अन्वेषण च्या अहवालातून समोर आली आहे. शहर पोलिस विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार मे २०१५ पर्यंत शहरात ३५ हत्या झाल्या. त्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या हत्यांची संख्या जोडल्यास ही संख्या ५०० च्या घरात पोहचते. त्यामुळे आता राज्यात हत्यांचे प्रमाण हे युपी, बिहार च्या खालेखाल असल्यामुळे राज्य पोलिस विभागाला या बाबीकडे गांभीर्याने कटाक्ष टाकून योग्य ते पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे हे विशेष.
 ००बॉक्स००
राज्यानुसार वर्षनिहाय हत्येचे प्रमाण
वर्ष          महाराष्टÑ    उत्तर प्रदेश     बिहार
२०११      २,८१८       ४,९५१      ३,१९८
२०१२      २,७१२       ४,९६६      ३,५६६
२०१३      २,५१२       ५,०४७      ३,४४१
२०१४      २,६७०        ५,१५०     ३,४०३
.......................................................
एकूण      १०,७१२     २०,११४    १३,६०८

००बॉक्स००
नागपूर शहरातील हत्यांची आकडेवाडी
वर्ष            हत्या
२०११       ११४
२०१२         ८८
२०१३       १०३
२०१४       ११९
२०१५        ३५ (मे पर्यंत)
...........................
एकूण         ४५९

Comments