Posts

Showing posts from 2020

कोरोना संबंधी पॉझिटीव्ह न्यूज...

Image
८५ दिवसांनी सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर कोरोना विरोधातील युद्धात भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे ८५ दिवसांनी पहिल्यांदाच सक्रिय रुग्णसंख्या सहा लाखांहून कमी नोंदवण्यात आली आहे. ६ ऑगस्टला देशातील सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या ५ लाख ९५ हजार एवढी नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी, ३० ऑक्टोबरला सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या ५ लाख ९४ हजारांच्या घरात होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सल्ल्यानूसार भारताने दर दशलक्ष लोकसंख्येमागे दिवसागणिक करण्यात येणार्या कोरोना तपासण्यांमध्येही उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे.   विविध राज्ये,केंद्रशासित प्रदेशांमधील सक्रिय रुग्ण संख्येचा वेग प्रत्येक ठिकाणच्या प्रयत्नानुसार वेगवेगळा आहे. पंरतू, कोरोनाविरोधातील लढ्यात हळहळू यश मिळत असल्याचे आकडेवारीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यशस्वितेच्या पुढच्या टप्प्यात ३५ राज्य,केंद्रशासित प्रदेशांनी निर्धारित चाचणी संख्या देखील ओलांडली आहे. भारतात दररोज दर दशलक्ष लोकसंख्येमागे ८४४ चाचण्या केल्या जात आहेत. दिल्ली,केरळमध्ये हे प्रमा

कोरोनामृत्यू संख्येने ओलांडला १ लाख २० हजारांचा उंबरठा !

गेल्या एका दिवसात ५० हजार नवीन कोरोनाग्रस्तांची भर; ५१७ रुग्णांचा मृत्यू  नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर, सुमेध बनसोड कोरोना महारोगराईने भारतात आतापर्यंत १ लाख २० हजार ५२७ रुग्णांचा बळी घेतला आहे. बुधवारी दिवसभरात ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामृत्यूचे प्रमाण त्यामुळे १.५०% एवढे नोंदवण्यात आले. असे असले तरी देशाचा मृत्यूदर हा जगातील इतर देशांच्या तुलनेत बराच कमी असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. गेल्या एका दिवसात देशात ४९ हजार ४८० नवीन रुग्णांची भर पडली. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ५६ हजार ४८० रुग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ८० लाख ४० हजार २०३ एवढी झाली असली तरी, यातील ७३ लाख १५ हजार ९८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६ लाख ३ हजार ६८७ रुग्णांवर (७.५१%) उपचार सुरु आहेत.  गेल्या एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत ७ हजार ११६ ची घट नोंदवण्यात आली आहे. देशाचा कोरोनामुक्तीदर गुरुवारी ९०.९९% नोंदवण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक ८ हजार ७९० कोरोनारुग्णांची भर पडली. केरळ सह महाराष्ट्र (६,७३

औषध निर्मिती क्षेत्रात ७८ हजार कोटी गुंतवणुकीचा केंद्राचा मानस !

Image
केंद्रीय रसायन मंत्री गौडांचे संकेत  नवी दिल्ली, २ ऑक्टोबर   कोरोन काळात अवघ्या जगाला मदतीचा हात देणाऱ्या भारतातील औषधनिर्मिती क्षेत्राला नव संजीवणी देण्याचा केंद्राचा मानस आहे. घावूक औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्रांच्या विकासासाठी केंद्राकडून एकूण ७८,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधून २.५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय रसायन आणि खते मंत्री एस.व्ही.सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय लाईफ सायन्स-२०२० परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याची क्षमता भारताच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रात दरवर्षी २८% वाढ होण्याचा अंदाज आहे. या उद्योगांमध्ये २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सची उलाढाल होईल, असा दावाही त्यांनी केला. अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या उद्योगांसाठी केंद्राने तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधनिर्मिती आणि चार ठिकाणी स्थायी वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्राची उभारणीस पाठिंबा दिला आहे. गौडा यांच्या वक्तव्यान

देशातील कोरोनामुक्तीचा दर ८३.५४ टक्के !

*गेल्या एका दिवसात ८६ हजारांहून अधिक *कोरोनाग्रस्तांची भर ; १ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू  नवी दिल्ली, १ ऑक्टोबर देशातील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुक्तीचा आलेखही वाढला आहे. गुरुवारी देशातील कोरोनामुक्तीचा दर ८३.५४% नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात देशभरात ८६ हजार ८२१ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, १ हजार १८१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणेज बुधवारी दिवसभरात ८५ हजार ३७६ रुग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले. सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत २६४ ची वाढ नोंदवण्यात आली आहे.  देशातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ६३ लाख १२ हजार ५८४ एवढी झाली आहे. यातील ५२ लाख ७३ हजार २०१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ९८ हजार ६७८ रुग्णांचा (१.५६%) दुदैवी मृत्यू झाला. देशातील सध्या ९ लाख ४० हजार ७०५ रुग्णांवर (१४.९०%) उपचार सुरु आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात १८ हजार ३१७ रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक (८,८५६),

कोरोनाचा उद्रेक सुरूच...

Image
देशातील कोरोनामृत्यूची संख्या २५ हजारांच्या उंबरठ्यावर  - गेल्या एका दिवसात ३२ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर  -६०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू  नवी दिल्ली, १६ जुलै देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक ​कोरोनाबाधितांची उच्चांकी भर पडत आहे. कोरोनारुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ञांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण क्षेत्र धोरण तसेच भौतिक दूरत्वाच्या नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे. गेल्या एका दिवसात देशभरात उच्चांकी ३२ हजारांहून अ​धिक कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ६०० हून अधिक कोरोनारूग्णांचा बळी गेल्या. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार गुरुवारी सकाळपर्यंत देशात तब्बल ३२ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६०६ रूग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यादरम्यान २० हजार ७८३ रुग्णांनी कोरोनवर मात मिळवल्याने त्यांना विविध रुग्णालयात डिस्चार्ज देण्य
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image