Posts

Showing posts from April, 2017

पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तें इथंच, इथंच आहे, इथंच आहे.

  पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तें इथंच, इथंच आहे, इथंच आहे. असा उल्लेख कवितेत जम्मू-कश्मीर संदर्भात सापडतो. मात्र ,दहशतवाद, फुटीरतावाद्यांच्या समस्येने कायम काश्मीर ग्रासलेलं आहे. रोजगार नाही म्हणून काही पैस्यानं करीता युवक फुटिरतयवाद्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनवर दगडफेक करतात. अश्या स्थितीचा फायदा घेत वर्षोन वर्ष फुटीरतावादी गट अश्या युवकांना भरकटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इथल्या युवकांना टेररिझम नको तर टुरिझम हवय हे विद्यमान केंद्र सरकार ने चांगलं ओळखल्याचं दिसतय. आता कश्मीर कात टाकेलं असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र एखाद्या प्रदेशाचा जर विकास करायचा असेल तर दळणवळणाची साधने चांगली असावी अस बोलल जात. आता त्याच साधनांच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरचा विकास केला जातोय. उधमपूर येथील चेनाइ-नाशरी टनल हे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.      तसं जम्मूकश्मीर म्हंटल तर अगोदर समोर येतात उंच उंच अश्या हिमालय पर्वतरांगा. हे चित्र डोळ्यासमोर आलं की बर्फाची ओढ, थंड वातवरण व उंच पर्वत रांगा पर्यटकांना आपल्या कडे खुणावतात त्यामुळं इथं प्रत्येक मौसमात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. म