Posts

Showing posts from February, 2017

चिन्नम्माची राजकीय एक्झिट

     मुख्यमंत्री बनण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शशिकला नटराजन यांचं स्वप्न तूर्तास भंगले आहे. मात्र,आपला विश्वासू चेहरा समोर करून अम्मांन नंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न आत्ता कारागृहात जाण्या अगोदर शशिकला (चिन्नम्मा) करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंगरुळु विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत उत्पन्ना हुन अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी चिन्नम्मा यांची चार वर्षांची शिक्षा कायम ठेवत १० कोटींचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय सध्या तामिळनाडूत सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमी वर आला आहे. त्यामुळे समोरच्या राजकीय डाव-पेच आखण्यात सर्व गट तयारी करत आहेत.एकत्र राहून अम्मांचं स्वप्न पूर्ण करू असे भावनिक आवाहन पन्नीरसेल्वम यांनी केले असले तरी पक्ष एकत्र राहील का असा गंभीर प्रश्न समोर निर्माण झाला आहे.       शशिकला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वा वरून ओ.पी ची हकालपट्टी केल्यामुळे राजकीय संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या विरोधात पक्षातील काही आमदार, खासदार तसेच पदाधिकारी पन्नीरसेल्वम यांच्या गोटात दाखल झाले आहे. विधिमंडळ नेते पदी श

. . . . . . . . . अखेर ओ.पीं च्या मुखातून बंडाचा 'ओ'

    हो मॅडम, हो सर,पक्षाचा आदेश सर्वमान्य,भाऊ बोले तैसा चाले. जनतेने निवडणून दिलेल्या नेत्यांना 'त्यांच्या नेत्यांचे' आदेश पाळावे लागतात. हे 'सर्वश्रुत' आहे. मात्र आदेश न पाळल्या नंतर कसा 'राजकीय भूकंप' होतो याचे एक ताज उदाहरण तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती वरून बघायला मिळत आहे. केवळ एका 'ओ' ने कसे राजकीय समीकरणे बदलू शकतात याचे हे उदाहरण.अर्थातच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते  शशिकला (चिन्नम्मा) विरुद्ध ओ.पन्नीरसेल्वम (ओ.पीं)  च्या राजकीय रस्सीखेच कडे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय इच्छा शक्ती जागी झाल्यामुळे ओ.पन्नीरसेल्वम यांनी पक्षाच्या महासचिव आणि विधिमंडळ दलाच्या नेत्या चिन्नम्मा विरोधात उघड बंड केला. त्यात विरोधकांची फूस देखील असू शकते. मात्र अगोदर पासून व्यक्तीपूजेत अग्रेसर असलेल्या तामिळनाडूच्या जनतेला 'इमोशनल' करून राजकारण सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जयललिता यांच्या विश्वासू (एके काळी जयललितांचा विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली पक्षातून काढलेल्या) चिन्नम्मा या सत्ता केंद्र होऊ बघत आहेत. अम्माच्या निधना नंतर ओ.पी क