Posts

Showing posts from March, 2017

मोदींच मांडलिकत्व

     उत्तर प्रदेश हेच एक लक्ष ११ मार्च व नंतर पुढच्या राजकीय कारकिर्दी करीता मोदी आणि शहा यांच्या जोडीने ठेवले असावं किंबहुना आत्ता च्या राजकीय हालचाली वरून तसंच समीकरणा वरून हे चित्र सर्वसामन्यां समोर उभं राहत आहे. त्यातच  मोदींच्या सावलीने अर्थातच अमित शहा यांनी या पाच राज्यांच्या विशेषता उत्तर प्रदेशची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. कदाचित या निवडणुकीच्या निकाला नंतर अमित शहा यांचे दिल्लीतील वास्तव्य समोर देखील राहील (राष्ट्रीय अध्यक्ष पद)कि त्यांच्या कडे गुजरातची जबाबदारी येणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे या सर्व परिस्थिती अगोदर हवे तितके राज्य बादशाहच्या पदरी मांडलिकत्वाच्या संकल्पने नुसार टाकण्याचे कामाला शहा लागले असावेत.  आत्ता मांडलिकत्वाचा थेट संबंध इतिहासाशी आहे. तत्कालीन काही राजवटींनी मोगलांचे तसेच ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. संरक्षण पुरवण्याचे काम मांडलिकत्व स्वीकारणाऱ्या राजवटींना देण्याचे काम मोगल आणि ब्रिटिश करायचे असा काहीसा इतिहास आहे. या मांडलिकत्वाच्या निमित्याने मोगल आणि ब्रिटिश त्यांचा विस्थार करत. आत्ता अश्याच प्रकारचे मांडलिकत्व संपूर्ण द