मोदींच मांडलिकत्व






    उत्तर प्रदेश हेच एक लक्ष ११ मार्च व नंतर पुढच्या राजकीय कारकिर्दी करीता मोदी आणि शहा यांच्या जोडीने ठेवले असावं किंबहुना आत्ता च्या राजकीय हालचाली वरून तसंच समीकरणा वरून हे चित्र सर्वसामन्यां समोर उभं राहत आहे. त्यातच 
मोदींच्या सावलीने अर्थातच अमित शहा यांनी या पाच राज्यांच्या विशेषता उत्तर प्रदेशची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. कदाचित या निवडणुकीच्या निकाला नंतर अमित शहा यांचे दिल्लीतील वास्तव्य समोर देखील राहील (राष्ट्रीय अध्यक्ष पद)कि त्यांच्या कडे गुजरातची जबाबदारी येणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे या सर्व परिस्थिती अगोदर हवे तितके राज्य बादशाहच्या पदरी मांडलिकत्वाच्या संकल्पने नुसार टाकण्याचे कामाला शहा लागले असावेत. 
आत्ता मांडलिकत्वाचा थेट संबंध इतिहासाशी आहे. तत्कालीन काही राजवटींनी मोगलांचे तसेच ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. संरक्षण पुरवण्याचे काम मांडलिकत्व स्वीकारणाऱ्या राजवटींना देण्याचे काम मोगल आणि ब्रिटिश करायचे असा काहीसा इतिहास आहे. या मांडलिकत्वाच्या निमित्याने मोगल आणि ब्रिटिश त्यांचा विस्थार करत. आत्ता अश्याच प्रकारचे मांडलिकत्व संपूर्ण देशातील राज्यांनी स्वीकारावं असं काहीस मोदींना आणि शहा यांना वाटत असावं असं एकूण चित्र निर्माण झालं आहे. पर्यायाने या जोडीचं काँग्रेस मुक्त भारत हे स्वप्नं पूर्ण होईल. मात्र, समोर असलेले काँग्रेस सारख्या मात्तबर पक्षाचे आव्हानामुळे सध्या तरी या जोडीचे लक्ष पूर्णत्वास येईल याची शक्यता तशी कमीच आहे.
     उत्तर प्रदेशात गेल्या वर्षभरापासून बैठकांच्या दौयातून उत्तर प्रदेशाच्या प्रत्येक मतदारांन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप परिवाराच्या माध्यमातून शहा यांनी केलाय. मात्र, या सर्व प्रयत्नातून मोदींची राजकीय इच्छा शक्ती ( देशाला काँग्रेस मुक्त करण्याची भाबडी इच्छा) प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच सध्या ज्या राज्यात आपले सरकार त्यांचे केंद्राकडून स्वागत व ज्या राज्यात आपले सरकार नाही त्या राज्यांना मांडलिकत्व स्वीकारण्याकरिता भाग पाडण्याची या जोडीचे प्रयत्न दिसून येतात. या मांडिलकत्व अभियानाची सुरवात किंबहुना उत्तराखंडची काँग्रेसची सत्ता अस्थिर करण्यापासून सुरु झाली असावी. उत्तराखंड मधील रावत सरकार अस्थिर करण्याचा आरोप विरोधकांनचा आहे. असो, उत्तराखंडचे काँग्रेस सरकार तेव्हा तरल आणि आताच्या "एझीट पोल" नुसार उत्तराखंड मधे काँग्रेस पुन्हा बाजी मारणार असल्याचं बोललं जातंय. यात केवढे तथ्य हे येणारा काळ सांगेल.
     मात्र, मांडलिकत्व या शब्धाचा वापर आत्ता होतांना दिसत आहे. तामिळनाडूची सत्ता एकहाती शशिकला नटराजन यांच्या हाती जात असल्याचे चित्र समोर येताच लागलीच उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्तीचे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण बाहेर काढण्यात आले आणि एका आठवड्याच्या आत त्या वर निकाल देखील आला असा आरोप शशिकला समर्थकांनी केला आहे. हा निकाल शशिकला यांच्या विरोधात गेला आणि त्यांची राजकीय कारकीर्द एका झटक्यात संपली. मात्र, शशिकला यांच्या गटात गेलेली सत्ता आपल्या मांडलिकतावा खाली आणण्या करिता अजून खेळी सुरु आहे. आज ना उद्या ती येईलच. कारण पलानीसामी यांचा विरोधात देखील या सत्तेच्या रस्सीखेच मध्ये अपहरण केल्याचा गुन्हा एका आमदाराने दाखल केला आहे, कदाचित याचा फायदा घेत केंद्र पलानीसामी यांचा जरब बसवू शकते. त्या मुळे तामिळनाडू देखील आत्ता या जोडीने सेट केले असावे.राहिला प्रश्न पंजाब चा. निवडणुकीच्या निकाला नंतर यावरही काही या जोडीने ठरवलं असेल. तूर्तास तरी मोदींचे मांडलिकत्व अभियान जरा जोरात सुरु आहे हे नक्की. 

sumedh bansod,
09172221991,
new delhi 
--------------------

Comments