पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तें इथंच, इथंच आहे, इथंच आहे.



  पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तें इथंच, इथंच आहे, इथंच आहे. असा उल्लेख कवितेत जम्मू-कश्मीर संदर्भात सापडतो. मात्र ,दहशतवाद, फुटीरतावाद्यांच्या समस्येने कायम काश्मीर ग्रासलेलं आहे. रोजगार नाही म्हणून काही पैस्यानं करीता युवक फुटिरतयवाद्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनवर दगडफेक करतात. अश्या स्थितीचा फायदा घेत वर्षोन वर्ष फुटीरतावादी गट अश्या युवकांना भरकटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इथल्या युवकांना टेररिझम नको तर टुरिझम हवय हे विद्यमान केंद्र सरकार ने चांगलं ओळखल्याचं दिसतय. आता कश्मीर कात टाकेलं असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र एखाद्या प्रदेशाचा जर विकास करायचा असेल तर दळणवळणाची साधने चांगली असावी अस बोलल जात. आता त्याच साधनांच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरचा विकास केला जातोय. उधमपूर येथील चेनाइ-नाशरी टनल हे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. 
    तसं जम्मूकश्मीर म्हंटल तर अगोदर समोर येतात उंच उंच अश्या हिमालय पर्वतरांगा. हे चित्र डोळ्यासमोर आलं की बर्फाची ओढ, थंड वातवरण व उंच पर्वत रांगा पर्यटकांना आपल्या कडे खुणावतात त्यामुळं इथं प्रत्येक मौसमात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. मात्र,जम्मू- काश्मीर मधील खराब रस्ते, इथलं वातावरण शिवाय पर्यटकांच्या गाड्यांच्या गर्दी मुळे होणाऱ्या वाहतूक खोळंबामुळे पर्यटकांसह स्थानिकांची देखील कूचबंना होते. मात्र, आता तसं होणार नाही. कारण जलदगतीने वाहतूक होऊन जम्मू-काश्मीर चा विकास व्हावा या करिता केंद्र सरकार सज्ज झालंय. त्याचाच एक भाग म्हणजे चेनाइ-नाशरी भुयारी महामार्ग. हा मार्ग डोळ्या समोर येताच वल्ड क्लास भुयारी मार्गाची प्रचिती येते. या भूयारी मार्गा मुळे आता शहरच नाही तर हृदय देखील जोडले जातील. उधमपूर येथील चेनाइ ते नाशरी पर्यंत बनवण्यात आलेल्या हा भुयारी महामार्ग म्हणजे देशातील वल्ड क्लास अभियांत्रिकीचे उत्तम उदाहणार आहे. जवळपास ९ किलोमीटर चा हा रस्ता खरोखरच बघताक्षणी डोळ्यात भरणारा आहे. 
   संपूर्ण इंटिग्रेटेड सिस्टम असलेला हा भुयारी महामार्ग देशातील पहिला हाय टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आला आहे. आयटीसीएस म्हणजेच "इंटिग्रेटेड टनल कंट्रोल सिस्टम" संपूर्ण संगणीकृत असून यात फायर कंट्रोल,वेंटीलेशन, सिग्नल, कमुनिकेशन, अटोमेटिक इलेक्ट्रिक सिस्टमसह वर्ल्ड क्लास सुविधा आहेत. प्रत्येक ३०० मीटर वर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याकरिता "क्रॉस पेसेज" बनवण्यात आले आहेत.शिवाय एसओएस केंद्र देखील आहेत. आपत्कालीन स्थितीत प्रवासी या केंद्रामध्ये जाऊन "कॅन्ट्रोल रूम" ला मदत मागवू शकतात. या केंद्रात प्राथमिक उपचार बॉक्स सह फायर उपकरणांची सुविधा आहे. या केंद्राचा दरवाजा उघडताच लागलीच कॅन्ट्रोलरूमला फोन कनेक्ट होतो. या वरून हा भुयारी महामार्ग कुठल्या दर्जाचा असेल याची प्रचिती येते.या कंट्रोल रूम मधून मदती करिता कॉल करतात पुढील पाच मिनिटात तुम्ही असलेल्या ठिकांणी मदत पोहोचती केली जाते. 
    जवळपास ९ किलोमीटर लांब असलेल्या या टनल मध्ये प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर ७ वाहनचालकांन करिता शिवाय ३० पादचाऱ्यान करिता "एक्सेप्ट टनल" बनवण्यात आले आहे. या ठिकानी चोवीस तास कर्मचारी तैनात असतो. गेटला असलेले बटन दाबताच संपूर्ण दार उघडलं जात आणि दुसऱ्या टनल मधून प्रवासी सुखरूप बाहेर पडू शकतात. त्यामुळ प्रवाश्यांच्या सुरक्षेवर हि टनल बनवतांना विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जम्मूला काश्मीर सोबत जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास १३ भुयारी मार्ग येत्या काळात बांधण्यात येणार आहे. त्यातील चेनाइ- नाशरी हा एक मोठा भुयारी मार्ग आहे. नाथाटॉप तसंच पटनीटॉप च्या डोंगराच्या गर्भांतून निघालेल्या या भूयारी मार्गाच्या बांधणीत बऱ्याच अडचणी आल्या. मात्र, या प्रोजेक्टला विक्रमी चार वर्षात पूर्ण करण्यात आले. येथील दगड हे मरी फॉर्मेशन मध्ये आहेत. काही ठिकांणी कमी तर काही ठिकांणी उत्तम गुणवत्तेचा दगड आठळतो. त्यामुळे इथं काम कारण सोपं नव्हतं. मात्र देशातील अभियंत्यांनी हे चेलेन्ज एक्स्पेट करत त्याला पूर्ण केलं. या टनल मुळे दररोज २७ लाखांच्या इंधनाची बचत होऊन प्रवास्यांचा २ तासांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळं इंधन आणि वेळेच्या बचती ही टनल करणार आहे.तसंच अपघात डिटेक्शन सिस्टम असल्यामुळं लागलीच अपघात झाला तर याची माहिती कंट्रोल रूम ला मिळणार आहे. 
 जवळपास ३ हजार ७२० कोटीं रुपये खर्चून या आशियातिल सर्वात लांब तसच वल्ड कलास सुविधांनी युक्त या टन मूळ स्थानिकांसह  प्रवास्यांची सोय  होणार आहे.मात्र, वाहतूक कमी होऊन व्यवसाय कमी होण्याची भीती पटनीटॉप येथील छोट्या दुकानदारांना भेडसावत आहे.असं जरी असलं तरी ५ मीटर हुन उंच असलेल्या वाहनांना या टनल मध्ये प्रवेश नाही. तसंच बर्फवृष्टी व  नाथाटॉप या सुंदर ठिकाणची मजा घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी पटनीटॉप या ठिकानी  होतेच. त्यामुळं स्थानिकांच्या व्यवसायावर फरक पडणार नाही. जम्मू वरून काश्मीरच अंतर हे जवळपास २९३ किलोमीटर च आहे. या अगोदर श्रीनगर ला जाण्याकरिता जम्मूतील हिल स्टेशन पटनीटॉप वरून जावं लागत होत. डोंगरघाट, नागमोडी सोबतच एकपदरी रस्ता असल्यामुळं इथं नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो . जवळपास ८ ते ९ तास ट्राफिक जाम मूळ पर्यटकांना पर्यायाने स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. शिवाय पटनीटॉप मध्ये बर्फवृष्टी होते. त्यामुळॆ काही दिवस हा रस्ता देखील बंद राहतो. चेनाइ  ते नाशरी हे अंतर जवळपास ४२ किलोमीटर चे आहे. मात्र या टनेल मुळे हेच अंतर कमी होऊन ९ किलोमीटर च्या घरात पोहोचले आहे. त्यामुळं आता सुसाट वेगाने पर्यटक व  काश्मीर मधील शेतकरी आपल्या ठिकाणी पोहोचणार आहेत. या टनलमूळ प्रवाश्यांचे दोन तासांचा त्रासदायक प्रवास वाचणार आहे. 
       नेमकी काय आहे टनल ची विशेषता????
१) आशियातील वल्ड कलास सुविधेने युक्त सर्वात लांब भुयारीमहामार्ग 
२)  फायर कंट्रोल,वेंटीलेशन, सिग्नल, कमुनिकेशन, अटोमेटिक इलेक्ट्रिक सिस्टमसह वर्ल्ड क्लास सुविधा.
३) प्रत्येक ७५ मीटर वर १२४ हाय रिसोल्युशन चे सीसीटीव्ही कॅमेरे
४) कठीण प्रसंगी बाहेर पडण्याकरिता पेरलर टनल 
५) मोबाईल कव्हरेज हि मिळणार 
६) वाहतुकी वरील ताण कमी होणार
७) संपूर्ण टनल स्मार्ट कंट्रोल रूम ने मॉनिटर होणार 
८) जम्मू काश्मीर मधील जवळपास २ हजार युवकांचा टनल निर्मितीत सहभाग 
९) प्रत्येक ३०० मीटर वर एसओएस केंद्र 
१०) टनल मुळे वाचणार दररोज २७ लाखांचे इंधन 
     हा केवळ मार्ग नाही तर हृदयांना जोडणारा प्रकल्प असल्याचं सांगून टेररिझम सोडून जम्मू काश्मीर च्या युवकांनी टुरिझम कडे लक्ष देण्याचे आवाहन प्रधानमंत्री मोदींनी केलंय. हि टनल एक भाग्य रेषा आहे.किंबहुना काश्मीर खोऱ्यातील युवकांच्या हाताला काम देऊन देशाच्या प्रगतीत त्यांना सहभागी करवून घेण्यारी. येत्या काळात असे १३ टनल बनवून काश्मीर ला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम केंद्र करणार आहे. मात्र एवढं मात्र खरं की पृथ्वी वरील स्वर्गात पोहोचण्या करिता ही टनल पर्यटकांचा तसंच स्थानिकांच्या दृष्टीने खरंच एक भाग्य रेखा आहे यात कुणाचे दुमत नसावे. 

सुमेध बनसोड़,
नवी दिल्ली,
०९१७२२२१९९१  
--------------------------------------------------------------------------------------

Comments