टीम अण्णा आणि वाद



काल टीम अण्णा चे ब्रेन म्हणून ओळखले जाणारे अरविंद केजरीवाल नागपुरात होते...इंडिया अगेन्स्ट करपशन या संघटने तर्फे  केजरीवाल यांच "जनलोकपाल आणि पुढचा मार्ग " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल होते...या व्याख्यानाला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती... मात्र व्याख्यान  संपताच सभागृहा बाहेर एका नवीन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना काळे झेंडे  दाखविले...मी स्वतः तिथे उपस्थित होतो..  बोटावर मोजण्या इतपत संख्या असलेल्या या कार्यकर्त्यांना अण्णा समर्थकांनी चांगलाच चोप दिला.... पुढे पोलीसांच्या तत्पर्ते मुळे मोठा अनर्थ टळला... उत्तर प्रदेश मध्ये देखील अरविंद केजरीवाल वर जाहीर सभेला जात असतांना चप्पल भिरकावण्यात आली होती  ....
team anna 

 अण्णा हजारेंच्या च्या जनलोकपाल आंदोलना नंतर किरण बेदी, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण यांची टी.आर.पि भलतीच वाढली आहे...एखाद्या वाहिनी वरील कार्यक्रमाची नसेल इतकी या लोकांची सध्या टी.आर.पि आहे.......प्रशांत भूषण यांनी  काश्मीर प्रश्नावर केलेल्या वाचाळ वक्तव्या  मुळे त्यांची टीम अण्णा मधील पत ही घसरली आहेच... भूषण यांना त्यांचाच कार्यालयात काही तरुणांनी मारहाण केली...हे प्रकरण देखील माध्यमांनी लाऊन धरल....प्रशांत भूषण सध्या तरी शांत आहेत...


याच्या वरील वाद संपत नाही तोच किरण बेदी यांच्यावर  त्यांना मिळालेल्या विमान सवलतीचा गैर फायदा घेतल्याचा  खुलासा  पुराव्यानिशी इंडिअन एक्संप्रेस ने केला.... त्यातच त्याच्या संस्थेच्या कोशाधक्षाने  राजीनाम  दिला....अण्णा हजारेनी काही दिवस मौन व्रत  धारण केल...या काळात  त्यांनी ब्लोग लिहिण्याचा निर्णय घेतला ..मात्र त्यांचा ब्लोग लिहिणाऱ्या राजू परुलेकारांवर सदया वाद सुरु आहे...कोअर समिती बरखास्त करण्याचा अण्णा चा मानस ब्लोग वर प्रकाशित केल्या मुळे अण्णा राजू परुरेकरवर नाराज झाले.....स्वामी अग्निवेश तर पहिले पासून दुखी  होतेच...आता हे दुखी अग्निवेश बिग बॉस च्या घरात जाणार आहे.


टीम अण्णा ला ग्रहण लागलाय का?.. टीम अण्णा च्या सदस्यांवर हल्ले करून तथाकथित लोक  आंदोलनाची पत घसरू  पाहत आहेत का?...या ग्रहानातून अण्णा आणि समिती केव्हा निघणार?  या आणि अजून काही प्रश्नाची उत्तरे केव्हा पर्यंत  मिळणार याचीच वाट आता बघावी लागणार आहे.....

Comments

  1. anna 27 pasun parat uposhanavar basat ahet...tula ajun ek artical cha vishay milala ahe...keep it up...

    ReplyDelete

Post a Comment