औषध निर्मिती क्षेत्रात ७८ हजार कोटी गुंतवणुकीचा केंद्राचा मानस !

केंद्रीय रसायन मंत्री गौडांचे संकेत 

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर 

कोरोन काळात अवघ्या जगाला मदतीचा हात देणाऱ्या भारतातील औषधनिर्मिती क्षेत्राला नव संजीवणी देण्याचा केंद्राचा मानस आहे. घावूक औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्रांच्या विकासासाठी केंद्राकडून एकूण ७८,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधून २.५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय रसायन आणि खते मंत्री एस.व्ही.सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय लाईफ सायन्स-२०२० परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.
देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याची क्षमता भारताच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रात दरवर्षी २८% वाढ होण्याचा अंदाज आहे. या उद्योगांमध्ये २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सची उलाढाल होईल, असा दावाही त्यांनी केला.
अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या उद्योगांसाठी केंद्राने तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधनिर्मिती आणि चार ठिकाणी स्थायी वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्राची उभारणीस पाठिंबा दिला आहे. गौडा यांच्या वक्तव्यानंतर कोरोना काळानंतर जागतिक बाजारपेठेत देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी औषध निर्मिती क्षेत्राचे मोठे योगदान राहणार असल्याचे बोलले जात आहे. 
या क्षेत्रामध्ये सन २०२४ पर्यंत ६५ अब्ज डॉलर्स पर्यंत तर, सन २०३० पर्यंत १२० अब्ज डॉलर्सपर्यंत उद्योग वृद्धी होण्याची शक्यता आहे. २०२५ पर्यंत वैद्यकीय उपकरणे क्षेत्राची उलाढाल ५० अब्ज डॉलर्स इतकी होईल, अशी गौडा यांनी व्यक्त केली.  
२०१८-१९ मध्ये भारताने ७३ अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केली आहे. त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत ही गुंतवणूक १८ टक्क्यांनी जास्त आहे. भारतात औषधी तसेच वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रात सन २०२४ पर्यंत ६५ अब्ज डॉलर्सपर्यंत तर, सन २०३० पर्यंत यामध्ये १२० अब्ज डॉलर्सपर्यंत उद्योग वृद्धी होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्रामध्ये सन २०२५ पर्यंत भारताचा वृद्धीदर २८ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आपल्या उद्योगांमध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

देव मनुष्यात आहे, माणसाच्या माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...

कोरोनामृत्यू संख्येने ओलांडला १ लाख २० हजारांचा उंबरठा !