
भाऊ-बहिणीच्या भांडणात ‘मुंडेंचा’ वापर? - संगणक परिचालकांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष - सहा आंदोलकांचे बेमुदत उपोषण सुमेध बनसोड / नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया आठवड्याचे कामकाज तसे व्यवस्थित पार पडले. या आठवड्यात आपल्या विविध मागण्या करिता हजारो आंदोलक विधिमंडळावर पोहचले होते मात्र, हा विधिमंडळाचे या आठवड्याचे कामकाज हे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज मुळे बरेच चर्चेचा विषय ठरला. अश्याही परिस्थितीत ते मागे हटायला तयार नाही, लेखी आश्वासन मिळे पर्यंत तसेच परिपत्रक निघेपर्यंत मागे हटणार नाही या भूमिकेवर ते आताही ठाम आहेत. शनिवार व रविवारी कामकाज बंद असताना देखील ते अजूनही आंदोलन स्थळी आहेत. त्यांची तशीही निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे या आंदोलकांचा ‘प्रायोजक’ कोण असा प्रश्न पर्यायाने उपस्थित केला जात आहे. या आंदोलकांना विरोधकांची तर फुस नाही ना असाही संशय घेतला जात आहे. संगणक परिचालकांचर पदनिश्चिती करून त्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता विधीमंडळावर संगणक परिचालकांचा मोर्चा मंगळवारी (ता.१५) धडकला होता. अगोदर पासूनच हा मोर्चा आक्र...