भाऊ-बहिणीच्या भांडणात ‘मुंडेंचा’ वापर?
- संगणक परिचालकांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष
- सहा आंदोलकांचे बेमुदत उपोषण
सुमेध बनसोड / नागपूर
हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया आठवड्याचे कामकाज तसे व्यवस्थित पार पडले. या आठवड्यात आपल्या विविध मागण्या करिता हजारो आंदोलक विधिमंडळावर पोहचले होते मात्र, हा विधिमंडळाचे या आठवड्याचे कामकाज हे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज मुळे बरेच चर्चेचा विषय ठरला. अश्याही परिस्थितीत ते मागे हटायला तयार नाही, लेखी आश्वासन मिळे पर्यंत तसेच परिपत्रक निघेपर्यंत मागे हटणार नाही या भूमिकेवर ते आताही ठाम आहेत. शनिवार व रविवारी कामकाज बंद असताना देखील ते अजूनही आंदोलन स्थळी आहेत. त्यांची तशीही निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे या आंदोलकांचा ‘प्रायोजक’ कोण असा प्रश्न पर्यायाने उपस्थित केला जात आहे. या आंदोलकांना विरोधकांची तर फुस नाही ना असाही संशय घेतला जात आहे.
संगणक परिचालकांचर पदनिश्चिती करून त्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता विधीमंडळावर संगणक परिचालकांचा मोर्चा मंगळवारी (ता.१५) धडकला होता. अगोदर पासूनच हा मोर्चा आक्रमक होता. मंगळवारीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या मोर्चाला भेट देत न्याय देण्याचे आश्वासन दिले होते, अश्यातच हा विषय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्याशी संबधित आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते सिद्धेश्वर मुंडे हे देखील बीड जिल्'ातील आहे, त्यामुळे आता विधिमंडळातील विरोधी आणि सत्ताधारी बाकावर बसणारे भाऊ-बहिणीच्या राजकीय भांडणा करिता या मुंडेंचा वापर केला जातोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही प्रश्न निर्माण होण्या करिता बरेच कारणही जवाबदार आहेत. १५ डिसेंबरला विधिमंडळावर निघालेले मोर्चे त्याच दिवशी विर्सर्जीत झाले मात्र, हा मोर्चा आतापर्यंत कायम आहे. महिलांच्या निवासा करिता वर्धा रोड वरील प्रगती सभागृहात व्यवस्था करण्यात आली असल्याची विश्वसनिय माहिती पदाधिकाºयांनी दिली आहे. तसेच आंदोलकांच्या जेवणा करिता नागपूरातील एका कॅटरर्स कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्यक आंदोलकांकडून ५०० रुपये शुल्क घेण्यात आले आहे मात्र, एवढ्या तुटपुंज्या निधीत जेवण्याची व्यवस्था इतके दिवस करणे अशक्य आहे. सकाळचे तसेच संध्याकाळचे जेवण या आंदोलकांना मोर्चास्थळी पुरवले जाते. त्यामुळे या मोर्चांचा ‘रसदार’ कोण असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुंडेंच्या राजकारणात मुंडेच तर या मागचे मास्टर मांर्इंड तर नाही ना असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजाच्या तिसºया आठवड्याच्या पहिल्यादिवशी आंदोलकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
००बॉक्स००
सहा नेत्यांचे बेमुदत उपोषण सुरू
संगणक परिचालकांची संख्या निश्चिती करून त्यांना शासन सेवेत सामावून घेणे या आणि अश्या अनेक प्रलंबित मागण्या करिता हा मोर्चा विधिमंडळावर धडला होता. या मोर्चावर लाठीचार्जही पोलिसांनी केला मात्र, आंदोलक अजूनही आंदोलनस्थळी बसून आहेत. आज शनिवार (ता.१९) सकाळपासून आंदोलनाचे नेतृत्व करणाºया कोर कमिटी मधील सहा नेत्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याची विश्वसनिय माहिती आहे. यात सिद्धेश्वर मुंडे, राकेश देशमुख, विजय वाघ, मयुर कांबळे , संदीप पाटील व देवेंद्र गेडाम यांचा सहभाग आहे. राज्यात एकूण २७ हजार संगणक परिचालक आहेत त्यापैकी येत्या सोमवारी २६ हजार संगणक परिचालक आंदोलनस्थळी दाखल होणार असल्याची माहिती उपोषणकर्त्यांकडून देण्यात आली आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तिसºया आठवड्याच्या पहिल्या दिवशीच आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
..............................................

Comments