चिन्नम्माची राजकीय एक्झिट
मुख्यमंत्री बनण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शशिकला नटराजन यांचं स्वप्न तूर्तास भंगले आहे. मात्र,आपला विश्वासू चेहरा समोर करून अम्मांन नंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न आत्ता कारागृहात जाण्या अगोदर शशिकला (चिन्नम्मा) करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंगरुळु विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत उत्पन्ना हुन अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी चिन्नम्मा यांची चार वर्षांची शिक्षा कायम ठेवत १० कोटींचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय सध्या तामिळनाडूत सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमी वर आला आहे. त्यामुळे समोरच्या राजकीय डाव-पेच आखण्यात सर्व गट तयारी करत आहेत.एकत्र राहून अम्मांचं स्वप्न पूर्ण करू असे भावनिक आवाहन पन्नीरसेल्वम यांनी केले असले तरी पक्ष एकत्र राहील का असा गंभीर प्रश्न समोर निर्माण झाला आहे. शशिकला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वा वरून ओ.पी ची हकालपट्टी केल्यामुळे राजकीय संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या विरोधात पक्षातील काही आमदार, खासदार तसेच पदाधिकारी पन्नीरसेल्वम यांच्या गोटात ...