चिन्नम्माची राजकीय एक्झिट


     मुख्यमंत्री बनण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शशिकला नटराजन यांचं स्वप्न तूर्तास भंगले आहे. मात्र,आपला विश्वासू चेहरा समोर करून अम्मांन नंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न आत्ता कारागृहात जाण्या अगोदर शशिकला (चिन्नम्मा) करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंगरुळु विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत उत्पन्ना हुन अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी चिन्नम्मा यांची चार वर्षांची शिक्षा कायम ठेवत १० कोटींचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय सध्या तामिळनाडूत सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमी वर आला आहे. त्यामुळे समोरच्या राजकीय डाव-पेच आखण्यात सर्व गट तयारी करत आहेत.एकत्र राहून अम्मांचं स्वप्न पूर्ण करू असे भावनिक आवाहन पन्नीरसेल्वम यांनी केले असले तरी पक्ष एकत्र राहील का असा गंभीर प्रश्न समोर निर्माण झाला आहे.
      शशिकला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वा वरून ओ.पी ची हकालपट्टी केल्यामुळे राजकीय संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या विरोधात पक्षातील काही आमदार, खासदार तसेच पदाधिकारी पन्नीरसेल्वम यांच्या गोटात दाखल झाले आहे. विधिमंडळ नेते पदी शशिकला यांचे विश्वासू ई.पनालीस्वामी यांची निवड करण्यात अली आहे.अश्यात देशाचे महाधिवक्त्ये मुकुल रोहतगी यांनी आठवड्याभराच्या आत विश्वास बहुमत घेण्याचा सल्ला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना केला दिला आहे. अण्णा द्रमुक कडे १२० आमदारांचे पाठबळ असल्याचे सूत्र सांगत आहेत. 
       अगोदर पासून सर्व आमदार हे आम्हच्या सोबत आहे असे सांगणाऱ्या चिन्नमा यांच्या गोटातून हळू हळू आमदारांची गळती झाली.दुसरीकडे अण्णा द्रमुकचे तुकडे कधी पडतात याच्या प्रतीक्षेत असलेला मुख्य विरोधी पक्ष एडीएमके पन्नीरसेल्वम यांना बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी ८९ आमदारांचे पाठबळ देणार असल्याची चर्चा आहे. मात्र या विश्वास मतात कुठल्याही गटाला स्पष्ट बहुमत सिद्ध करता आलं नाही तर राजकीय तिढा अजून वाढेल. केंद्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या तामिळनाडूत राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस यावेळी करण्याची वेळ येईल. सध्या तरी असे काही संकेत मिळत नसले तरी शक्यता नाकारता येत नाही. पन्नीरसेल्वम यांच्या सोबत असलेल्या आमदारांवर देखील पक्ष कारवाई करू शकतो. अश्यात त्यांची सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व लक्ष आत्ता राज्यपालांच्या निर्णयाकडे लागले आहे. या आठवड्यात विशेष अधिवेशन बोलवून सी. विद्यासागर राव दोन्ही गटाला आपले बहुमत सिद्ध करण्यास पाचारण करू शकतात. त्यामुळे चिन्नमा यांच्या एक्झिट नंतर कुणाची एंट्री होणार आणि सत्ता केंद्र चिन्नमा कडेच राहणार आहेत का ? असे अनेक प्रश्न या निमित्याने समोर उभे आहेत. 

सुमेध बनसोड,
नवी दिल्ली,
०९१७२२२१९९१ 
----------------------------------------------------

Comments