. . . . . . . . . अखेर ओ.पीं च्या मुखातून बंडाचा 'ओ'

    हो मॅडम, हो सर,पक्षाचा आदेश सर्वमान्य,भाऊ बोले तैसा चाले. जनतेने निवडणून दिलेल्या नेत्यांना 'त्यांच्या नेत्यांचे' आदेश पाळावे लागतात. हे 'सर्वश्रुत' आहे. मात्र आदेश न पाळल्या नंतर कसा 'राजकीय भूकंप' होतो याचे एक ताज उदाहरण तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती वरून बघायला मिळत आहे. केवळ एका 'ओ' ने कसे राजकीय समीकरणे बदलू शकतात याचे हे उदाहरण.अर्थातच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते शशिकला (चिन्नम्मा) विरुद्ध ओ.पन्नीरसेल्वम (ओ.पीं) च्या राजकीय रस्सीखेच कडे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय इच्छा शक्ती जागी झाल्यामुळे ओ.पन्नीरसेल्वम यांनी पक्षाच्या महासचिव आणि विधिमंडळ दलाच्या नेत्या चिन्नम्मा विरोधात उघड बंड केला. त्यात विरोधकांची फूस देखील असू शकते. मात्र अगोदर पासून व्यक्तीपूजेत अग्रेसर असलेल्या तामिळनाडूच्या जनतेला 'इमोशनल' करून राजकारण सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जयललिता यांच्या विश्वासू (एके काळी जयललितांचा विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली पक्षातून काढलेल्या) चिन्नम्मा या सत्ता केंद्र होऊ बघत आहेत. अम्माच्या निधना नंतर ओ.पी कडे असलेले सत्ते चे धागे त्यांनी आपल्याकडे घेण्यास सुरवात केली. आणि आपणच आत्ता अम्माचे  वारसदार आहोत अश्या अविर्भावात चिन्नम्मा वावरू लागल्या. अर्थातच या सर्व गोष्टींमुळे चिन्नम्मा कडे सत्ता केन्द्र गेले तर होणारे आगामी राजकीय बदल, फायदे व तोटे लक्षात आल्यानंतर सोयीचे राजकारण सुरु होत. 
      " मी महिला आहे आणि त्या मुळेच मला विरोध केला जात आहे" शशिकला यांचे हे विधान तस ऐकण्या करिता नवीन नाही. कदाचित शशिकला नटराजन यांना यंदा 'इमोशनल कार्ड' सह 'महिला कार्ड' खेळायचे असेल.ओ.पी व चिन्नमा यांच्या मधील हा काट-शह चा डाव गेल्या आठवडा भरा पासून सुरु असतांना आत्ता एकदाचा काय सोक्ष मोक्ष लागो अशीच भावना तामिळनाडूच्या जनतेची झाली असावी. 
   त्यातच राज्यपाल सी.विद्यासागर हे करत असेलला विलंब शशिकला यांना चांगलीच जिव्हारी झोम्बली आहे. आफ्टर ऑल राज्यपाल पद हे नामधारी असल्यामुळे अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारने राष्ट्रपतींना सुचवलेल्या सूचना राष्ट्रपतींच्या माध्यमातून मान्य करण्याचे तसेच त्याचा अंमल करण्याचे त्यांचे काम. त्यातच ओ.पी यांनी दाखवलेल्या हिमतीची दाद द्यावी लागेल. ऐरवी अम्मा समोर 'ओ' देखील न काढणारे ओ.पी यांनी चक्क अम्मा नंतर त्यांच्या जवळच्या चिन्नम्मा विरोधात बंडाळी केली. 
  चिन्नम्मा यांच्या पूर्व इतिहासाची ढाल करत राज्यातील मतदारांना भावनिक आवाहन करण्याचे प्रयत्न ओ.पी यांनी देखील केले. मात्र भावनिक आवाहन आणि चांगलं काम या हि पेक्षा महत्वाचं आहे 'सांख्यिक' पाठबळ. ओ.पी च्या मागे आत्ता कुठे हळूहळू चिन्नम्मा यांच्या विरोधात बंडाळी करत काही मंत्री, खासदार तसेच पक्षाचे पदाधिकारी उभे झाले आहे. मात्र 'कौन बनेगा मुख्यमंत्री' हे तर आकडेवारी आणि समर्थनावरच ठरेल. चिन्नम्मा या मुख्यमंत्री झाल्या तर तामिळनाडू च्या राजकारणात नवीनपर्व सुरु होईल. अम्मांची गादी चिन्नम्मा कडे जाईल. शशिकला यांचे पती नटराजन हे काँग्रेस च्या जवळचे असल्याचे बोललं जात. मात्र 'सब कुछ नसीब पे हे'. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मे महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी करिता आत्ता पासूनच तयारी सुरु केली आहे.अश्यातच अण्णा द्रमुक चे ५२  खासदारांच्या मतावर भाजपचा डोळा आहे. म्हणून भाजप हा डाव सहजा सहजी सोडणार नाही असं चित्र आहे. त्यामुळे ओ.पी च्या बंडा मागे भाजप असल्याचा आरोप झाला. या बंडाच्या परद्या मागे कुणी का असो ना. मात्र एरवी तोंडातून साधा 'ओ' देखील न काढणाऱ्या ओ.पींच्या तोंडातून बंडाचा 'ओ' निघाला हे विशेष. 

सुमेध बनसोड,
नवी दिल्ली,
०९१७२२२१९९१
----------------------------------------------------------------

Comments