टीम अण्णा आणि वाद

काल टीम अण्णा चे ब्रेन म्हणून ओळखले जाणारे अरविंद केजरीवाल नागपुरात होते...इंडिया अगेन्स्ट करपशन या संघटने तर्फे केजरीवाल यांच "जनलोकपाल आणि पुढचा मार्ग " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल होते...या व्याख्यानाला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती... मात्र व्याख्यान संपताच सभागृहा बाहेर एका नवीन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखविले... मी स्वतः तिथे उपस्थित होतो.. बोटावर मोजण्या इतपत संख्या असलेल्या या कार्यकर्त्यांना अण्णा समर्थकांनी चांगलाच चोप दिला.... पुढे पोलीसांच्या तत्पर्ते मुळे मोठा अनर्थ टळला... उत्तर प्रदेश मध्ये देखील अरविंद केजरीवाल वर जाहीर सभेला जात असतांना चप्पल भिरकावण्यात आली होती .... team anna अण्णा हजारेंच्या च्या जनलोकपाल आंदोलना नंतर किरण बेदी, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण यांची टी.आर.पि भलतीच वाढली आहे...एखाद्या वाहिनी वरील कार्यक्रमाची नसेल इतकी या लोकांची सध्या टी.आर.पि आहे.......प्रशांत भूषण यांनी काश...