शाळेची BAG


आज बस stop वर मला एक चिमुकला बस ची वाट बघतांना उभा दिसला, त्याची आई त्याला स्कूल बस पर्यंत सोडायला आली होती...त्याच्या पाठीवरच भली मोठी स्कूल bag  होती . त्या  bag  च ओझ बघून माझा जीव कासावीस झाला..त्याचा वय अंदाजे ७ ते ८ वर्ष असाव...त्याचा वयाचा पेक्ष्या जास्त वजन त्या bag च होत...लगेच मनात विचार येऊन गेला की वयानुसार पुस्तकाचं ओझ स्कूल bag मधून कमी का होत नाही....? 
         शाळेचे दिवस प्रत्येकांच्याच जीवनातील अविस्मरणीय दिवस असतात....शाळेत असतांना  केलेल्या मज्या, मस्ती, अभ्यास सर्व काही आयुष्भर लक्ष्यात राहतात ...शाळेचे दिवस मुळात असतातच मजा,मस्ती करायला...काहीतरी नवीन शिकायला..शाळेमधले अजून काही गोड प्रसंग माझ्या मनात घर करून आहेत,पण शाळेमध्ये असतांना एका गोष्टीने कधीच माझा पिच्छा सोडला नाही,ती गोष्टय म्हणजे वजनदार" दफ्तर"...हवतर स्कूल bag म्हणा... सगळ्या विषयांची पुस्तक,त्यांची नोट बुक,इतर साहित्य असा त्या bag .मधला लवाजमा... ती स्कूल bag सांभाळन   म्हणजे एक कलाच...कसबस या स्कूल bag चा पिच्छा कॉलेज मध्ये गेल्यावर सुटला..वास्तविक कॉलेज मध्ये या पेक्ष्या जास्त पुस्तक हवी, पण इथ जरा उलटच कारभार होता....ज्या वयात मुलांला मुक्त विचारंच शिक्षण हव, नेमका त्याच वयात त्याच्यावर पुस्तकी ओझ लादल जात...माझी bag आता खूपच हलकी आहे कारण मी आता M .A करतोय, तस पाहिलं गेल तर वयामाना नुसार जर पुस्तकी ओझ ठरत असेल तर मग M .A ला असतांना पुस्तकातून मुक्तता वायला हवी...नाही का? पण माझ सद्य केवल एका नोट बुक वर भागत...लहान मुलांच्याही स्कूल BAG इतक्या हलक्या का करता येऊ नये.?  माझी  कॉलेज bag म्हणजे एक शबनम,त्यात एक नोट बुक,फावल्या वेळात वाचायला एक छान पुस्तक आणि एक डायरी..याचावर संपूर्ण दिवसाचा खेळ...

Comments