आपण भेटलोय का कधी?


  आयुष्यात कधी कधी अशे प्रसंग येतात  की ज्याला आपण या पूर्वी कधीही पाहिलेलं नसत त्याला भेटल्या सारख वाटत. सर्वांच्या आयुष्यात असे एक दोन अनुभव येतातच..असा माझ कयास आहे...आज तो माझ्या जीवनात आलाय...पाहू काय होतंय...
      आज पहिल्यांदा ती मला बस stop वर उभी दिसली.. अनोळखी भावांनी मी तिच्या कडे पाहिलं, तीन माझ्या कडे पाहिलं.दोघाही एकमेका कडे पाहत राहिलो..पण ओळख काही पटली नाही..पुढच्या क्षणी बस आली आणि मी बस मध्ये चढलो...दुसऱ्या दिवस पुन भेटीच्या योग घेऊन आला मात्र ती आज बस stop वर नव्हती....थोडा निराश झालो पण पुन्हा उद्या भेटीची उम्मेद मनात होतीच की..प्रवास करत आपल्या स्थानकापर्यंत पोहोचलो...बघतो तर काय पुठे ती उभी..क्षणात वाटल कि बोलाव,ओळख वाढवावी,पण कसल काय,हिम्मतच झाली नाही...वाटल थोडा वेळ घ्यावा पण दुसऱ्याच क्षणी वाटल नको वेळ न घालवता बोलावच..पण घळ्यालीचा काटा वेगाने पुठे सरकत होता आणि ऑफीसचा वेळ खुणावत होता..पुरती वेळ मारली आणि ऑफीस च्या दिशेने निघालो...तिन विलक्षण  नजरेन मला पाहिलं तिचे डोळे माझ्यावर खिळले होते पण पुरता वेळ आड येत होता...
                           दुसऱ्या दिवशी परत ती बस stop वर भेटली आज जरा जास्तच खुश दिसत होती...का कोण जाने पण मी मात्र मनाला धीर देत आज तिच्या जवळ गेलो..आपण या पूर्वी कधी भेटलोय का?....   नाही तर?..... लगेच उत्तर मिळाल...मी सुमेध,..  आपण? प्रश्नार्थक चीन्ह चेहर्यावर आणून मी बोललो...मी अपर्णा..वाह छान नाव आहे हो...मी लगेचच तिच्या कढून अपेषित नसलेल्या उत्तरावर पुन्हा प्रश्न टाकला.....तुझही नाव छान आहे..क्षणाचाही वेळ न घालविता ती उत्तरली..धन्यवाद..सूर जुळतील अस वाटल आणि झालाही तसच थोड्या गप्पा रंगल्या आणि मग बस आली...हळू हळू बस मध्ये कालपर्यंत अनोळख्या सारखे चढनारे आम्ही दोघे सोबत चढलो ..माझ  स्टोप आल्यावर मी तिचा निरोप घेतला..त्या नंतर का कोण जाने पण आमच्या भेटीचा योग कधी आलाच नाही.. नंबर नसल्यामुळे संपर्क पण नाही..आयुष्यात पुठे भेटू तेव्हा भेटू पण अस का होत कि ज्याला आपण ओळखत नाही ,ज्याला यापूर्वी कधी पाहिलं नाही त्याला पहिल्या सारख का वाटत? कधीही न विसरणारे ते दोन दिवस अजून हि आठवणीत आहेत...पण या का च अजूनही उत्तर मिळालेलं नाही...

Comments