देव मनुष्यात आहे, माणसाच्या माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...

बाबा आणि भक्तांची जोडगोडी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बघायला मिळते. अशात काही बाबांच सो कॉल्ड चमत्कारीक व्यक्तिमत्व भुरळ घालणारे असतात. किंबहुना त्यांना तसं प्रस्तुत केलं जात. सध्या देशात स्वतःला जगा समोर प्रेसेंट करण्याच वेगळच फ्याड आलंय. त्यामुळं अध्यात्माचा तिळमात्र संबंध नसलेले बाबा प्रेसेंटेन्शन आणि सेल्फमार्केटिंग मध्ये लागले आहे. सर्वच बाबा असे आहेत असं नाही, मात्र त्यांची संख्या कमी देखील नाहीच. मात्र, एखाद्या बाबाचं बिंग फुटल्या नंतर देखील भक्तांची बाबा प्रती असलेली श्रद्धा हि अंध आहे. आणि मग हीच अंधश्रद्धा हिंसेला प्रवृत्त करते. या हिंसेचे कदापिही समर्थन करता येणार नाही. मात्र, अशी स्थिती निर्माण होण्याला जवाबदार असलेल्या परिस्थिती नक्कीच विचार करायला भाग पाडते. एखाद्या बाबाचा अटके नंतर हिंसा होण्याची अनेक उदाहरण आहेत. मग संत रामपाल असो वा नुकतीच अटक झालेल्या गुरमीत राम रहीम च उदाहरण असो. यात हिंसेच्या घटनेत एक बाबतीत बरेच साम्य आहे. ते म्हणजे, हिंसेत झालेली जीवितहानी.. ज्यांनी आपले प्राण गमावले ते एकतर अंधश्रद्धाळू भावीक असतात किंवा भाविकांच्या हिंसेत आपले प्राण गमावणारा सुरक्षा यंत्रणानाचा कर्मचारी असतो तर कधी कधी तो सामान्य स्थानिक नागरिक असतो ज्याचा या घटनेशी काहीही संबंध नसतो.
      तसं बघितलं गेलं तर आपल्या देशाला अध्यात्माची एक वेगळी जोड आहे. देशातील अध्यात्म जवळून जाणून घेण्या करिता संपूर्ण जगातुन अनेक विदेश पर्यटक देशात "अध्यात्म टुरिझम" करण्याकरीता दाखल होतात. अशातच अश्या या घटना देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत. त्यामुळं अशा बाबांमूळ देशाची प्रतिमा मलीन होत असताना सोकोल्ड देशभक्त का चूप आहेत? असा प्रश्न निर्माण होतोय. मुळात अशा बाबांना धार्मिकतेची झालर असल्यामूळ त्यांच्यावर एकाएक आरोप करण सोपं नसत. धार्मिक भावना जिथं येते तिथं राजकीय इच्छाशक्ती देखील मतांच्या हवास्यांपायी बोथट होते. आणि मग या बोथट झालेल्या इच्छेचा पुरेपूर फायदा घेत अंधभक्त त्यांच्या श्रद्धेपाई वाट्टेल ते वर्तन करत सर्वसामान्यांना वेठीस धरतात. हरियाणाच्या पंचकुआ मधे गुरमीत बाबा राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्या नंतर झालेली हिंसा म्हणजे बोथट झालेली राजकीय इच्छाशक्तीच उत्तम उदाहरण आहे. अशीच हिंसा नोव्हेंबर २०१४ मध्ये संत रामपाल यांच्या अटकेवेळी घडवून आणण्यात आली होती. अश्या प्रकरणानंतर फारफार तर एखादी चौकशी समिती राज्यसरकार तर्फे बनवण्यात येते. या समितीच्या अहवाला वरून केंद्राचे समाधान झालं नाही तर केंद्र सरकार देखील एखादी समिती स्थापन करते. मात्र जवाबदारी निश्चित करून एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करण, राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणे म्हणजे अश्या घटनांचे समाधान निश्चितच नाही. काहीतरी ठोस समाधान असलं पाहिजे, आणि सर्वसामान्य भक्तच ते समाधान शोधू शकतात. प्रत्येक गोष्टीला आपल्या बुद्धीच्या सचोटीवर तपासून निर्णय घ्यावा असं बुद्धिझम मधे सांगितलं जात. तर्कवितर्क लावलाच पाहिजे. अशातच एखाद्या बाबाच्या आहारी जातांना आपल्या बुद्धीची सचोटीवर तो खरा उतरतोय कि नाही हे बघितलं पाहिजे. आणि शक्यतो सोकोल्ड बाबांच्या आहारी जाऊच नये. देव हा मनुष्यातच आहे. पर्यायांन देव माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...


शेवटी एकच
"जगी सर्व सुखी असा कोण आहे, 
विचारी मना तूच शोधूनी पाहे..." 





Comments

  1. Nice... But what about andhbhakt and politicians..

    ReplyDelete
  2. Nice... But what about andhbhakt and politicians..

    ReplyDelete
  3. Nice writeup, in fact I believe, God is in everyone, it's your own soul which should be clean in all respect and if that's so, you will not wander to find almighty God in any Baba.

    ReplyDelete

Post a Comment