केंद्रीय रसायन मंत्री गौडांचे संकेत नवी दिल्ली, २ ऑक्टोबर कोरोन काळात अवघ्या जगाला मदतीचा हात देणाऱ्या भारतातील औषधनिर्मिती क्षेत्राला नव संजीवणी देण्याचा केंद्राचा मानस आहे. घावूक औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्रांच्या विकासासाठी केंद्राकडून एकूण ७८,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधून २.५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय रसायन आणि खते मंत्री एस.व्ही.सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय लाईफ सायन्स-२०२० परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याची क्षमता भारताच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रात दरवर्षी २८% वाढ होण्याचा अंदाज आहे. या उद्योगांमध्ये २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सची उलाढाल होईल, असा दावाही त्यांनी केला. अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या उद्योगांसाठी केंद्राने तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधनिर्मिती आणि चार ठिकाणी स्थायी वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्राची उभारणीस पाठिंबा दिला आहे. गौडा यांच्या ...
Nice Coverage
ReplyDeleteधन्यवाद सुमेध जी, खुप छान तुम्ही विषय मांडलाय.
ReplyDelete