देशातील कोरोनामुक्तीचा दर ८३.५४ टक्के !


*गेल्या एका दिवसात ८६ हजारांहून अधिक *कोरोनाग्रस्तांची भर ; १ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू 

नवी दिल्ली, १ ऑक्टोबर

देशातील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुक्तीचा आलेखही वाढला आहे. गुरुवारी देशातील कोरोनामुक्तीचा दर ८३.५४% नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात देशभरात ८६ हजार ८२१ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, १ हजार १८१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणेज बुधवारी दिवसभरात ८५ हजार ३७६ रुग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले. सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत २६४ ची वाढ नोंदवण्यात आली आहे. 
देशातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ६३ लाख १२ हजार ५८४ एवढी झाली आहे. यातील ५२ लाख ७३ हजार २०१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ९८ हजार ६७८ रुग्णांचा (१.५६%) दुदैवी मृत्यू झाला. देशातील सध्या ९ लाख ४० हजार ७०५ रुग्णांवर (१४.९०%) उपचार सुरु आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात १८ हजार ३१७ रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक (८,८५६), केरळ (८,८३०), आंधप्रदेश (६,१३३), तामिळनाडू (५,६५९), उत्तर प्रदेश (४,२२६), ओडिशा (३,४४३) तसेच दिल्लीत (३,३९०) सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले. 
देशात आतापर्यंत ७ कोटी ५६ लाख १९ हजार ७८१ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १४ लाख २३ हजार ५२ तपासण्या या बुधवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. 

सर्वा​धिक कोरोनाप्रभावित राज्यातील स्थिती 
    राज्य       कोरोनामुक्त   सक्रिय रुग्ण   मृत्यू 
१) महाराष्ट्र    १०,८८,३२२  २,५९,४६२  ३६,६६२
२) आंधप्रदेश  ६,२९,२११    ५८,४४५     ५,८२८
३) कर्नाटक     ४,८५,२६८   १,०७,६३५   ८,८६४
४) तामिळनाडू ५,४१,८१९    ४६,२६३     ९,५२०
५) उत्तर प्रदेश  ३,४२,४१५   ५०,८८३      ५,७८४
६) दिल्ली         २,४७,४४६   २६,९०८      ५,३६१
....... 

Comments