कोरोना संबंधी पॉझिटीव्ह न्यूज...

८५ दिवसांनी सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर कोरोना विरोधातील युद्धात भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे ८५ दिवसांनी पहिल्यांदाच सक्रिय रुग्णसंख्या सहा लाखांहून कमी नोंदवण्यात आली आहे. ६ ऑगस्टला देशातील सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या ५ लाख ९५ हजार एवढी नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी, ३० ऑक्टोबरला सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या ५ लाख ९४ हजारांच्या घरात होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सल्ल्यानूसार भारताने दर दशलक्ष लोकसंख्येमागे दिवसागणिक करण्यात येणार्या कोरोना तपासण्यांमध्येही उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. विविध राज्ये,केंद्रशासित प्रदेशांमधील सक्रिय रुग्ण संख्येचा वेग प्रत्येक ठिकाणच्या प्रयत्नानुसार वेगवेगळा आहे. पंरतू, कोरोनाविरोधातील लढ्यात हळहळू यश मिळत असल्याचे आकडेवारीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यशस्वितेच्या पुढच्या टप्प्यात ३५ राज्य,केंद्रशासित प्रदेशांनी निर्धारित चाचणी संख्या देखील ओलांडली आहे. भारतात दररोज दर दशलक्ष लोकसंख्येमागे ८४४ चाचण्या केल्या जात आहेत. दिल्ली,केरळमध्ये...