"पाणी रे पाणी"


  गावकर्यांची तहान भागवणार पाणीच गावकर्यांचा डोळ्यात पाणी आणतय...ऐकून नवल वाटेल मात्र हे खर आहे...नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द  प्रकल्पग्रस्थाना हे प्रकल्पाचाच पाणी डोळ्यात पाणी आणायला भाग पाडत आहे...गावात वीज नाही, शेती पाण्यात बुडालेली,रोजगार नाही..अशी परिस्थिती...प्रशासन काही करायला धजावत नाही.. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून जवळ जवळ ७ गावांनी गेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवणुकीवर बहिष्कार घातला. ग्रामपंचायातानी ठराव करून आपण बहिष्कार करणार असल्याच निवेदन सरकारकडे सादर केल होत ...शिवाय या गावातील लोकांनी कुठल्याही उमेदवाराला आपल्या गावात प्रचाराकरिता देखील भटकू दिल नाही..या गावांना भेट देण्याचा योग मला आला...इंदिरा सागर,गोसेखुर्द प्रकल्पाचा १९८८ ला राजीव गांधी यांच्या हस्ते उदघाटन झाल होत..आंदोलन झाली,निदर्शने झाली..मात्र अजून २५ वर्ष उलटूनही येथील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून ही व्यवथित सुटलेला नाही..
     गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्त गावाकडे जाणारा रस्ता....गावाच नाव होत जीवनापूर....रस्ता अगदी कच्चा आणि खराब....गावात प्रवेश करताना एक बैनर सर्वांच लक्ष आकर्षित करत होत...अर्थातच त्या बैनर ने माझ देखील लक्ष आकर्षित केल होत.. .ते बैनर होत बहिष्काराच...याच्या मागचा शोध घेण्याच्या प्रयत्न मी केला...तेव्हा फार विदारक आणि कटू सत्य पाहायला मिळाला...जीवनापूर हे २५०० लोक संख्येच गाव..तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मासेमारीचा ..गावात ५०० घर ही मासेमारी करणाऱ्यांची आहे...मात्र गावातील २५०० हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाली...एवढाच काय तर संकट मोचन हनुमानाच मंदिर देखील पाण्याखाली गेल आहे....या गावातील गावकर्यांना आस्थेसाठी ते एकच मंदिर होत आणि ते ही आता पाण्यात बुडाल आहे.. 
       गावातील वीज प्रशासनाने कापली..गावात वीज नाही.....तुटलेल्या विद्युतवाहिन्या..आणि पाण्यात  बुडलेल ट्रान्सफार्मर या वरून हे चित्र साफ दिसत होत.....विजे शिवाय पर्याय नाही म्हणून गावकऱ्यांनी दुसऱ्या गावातून विजेची व्यवस्था केली आहे...ती ही सर्वांनी मदत गोळा करून..काहीशी अशीच व्यवस्था या उर्वरित ७ गावात आहे...पाणी आता त्यांच्या घरापर्यंत पोहोचल आहे..जीवनापूर गावाचे सरपंच असलेले बाळाहरी मांढरे तर जगाव की मरव याच विवंचनेत होते..एका गावाचा सरपंच असा विचार करत असेल तर त्या गावाच्या जनतेचे काय हाल असेल याची कल्पना आपण करू शकता ... 
मग काय करायचं या विचारातून गावातील लोकांनी सर्वांनमताने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यानच्या निवडणुकी वर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत केला आहे..ते आम्हाला दाखवण्यसाठी त्यांनी मशी वर देखील बहिष्काराच संदेश त्या वेळी  लिहिला होता..तिच्या कडे बघूनच गावकर्यांच्या भावना किती तीव्र होत्या याची प्रचीती येत होती..... 
      मिरचीचे अधिक उत्पादन देणारा हा पट्टा..जीवनापूरच्या जवळच असलेले लाल भडक लाल भडक मिरच्यांची शेती बघता बघता खराडा गाव आल ..गावात प्रवेश करताना येथे देखील तसलंच बैनर दिसलं ..या गावात देखील मुख्य व्यवसाय शेतीचाच आहे...गावातील लोकांना रोजगार नाही..काय कराव ह्या चिंचेत येथील गावकरी देखील दिसत होते.....या सर्व शेतकर्यांना सरकार ने नुकसान भरपाई दिली आहे मात्र ही नुकसान भरपाई पुरेशी नाही असा दावा गावकरी करतात  ..सरकार प्रकल्पग्रस्थाना न्याय देताना भेदभाव करत असल्याचा आरोप ही गावकर्यांचा होता ..त्यामुळे जो पर्यंत योग्य पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आणि कुठल्याही उमेद्वारांनला गावात साधा प्रचार देखील करू दयायचा नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे...

गावकर्यांच्या काही ठळक मागण्या..
१) शेतजमिनीला आणि घराला मिहान प्रकल्प ग्रस्थान प्रमाणे मोबदला द्यावा..
२) राष्ट्रीय पुनर्वसन धोरण २००७ प्रमाणे पुनर्वसन करण्यात यावे
३) २०११ च्या भूमी अधिग्रहण कायद्या नुसार भाव व पुनर्वसन द्यावे..
४) कुटुंबातील किमान एकाला शासकीय नौकरी किवा २५ लाख नुसारभरपाई  प्रती कुटुंब मोबदला द्यावा.. 

         एवढा सर्व समस्या असतांना देखील गावकरी अजून ही आपलं जीवन अश्या हलाखीच्या दिवसात ही काढत आहेत...ते कुठेही आमच्या आदर सत्कारात माघे पडले नाहीत...गावातील स्थापत्य अभियंता असलेले शेख यांच्या घरी त्या दिवशी दुपारच जेवण करण्याचा योग आला...गोसेखुर्द प्रकल्पातील ताज्या मच्छी चा छान बेत या निम्मित्याने जुळून आला...डोंग्यात बसून पाण्यातून गाव बघानाच्या अनुभव ही माझ्यासाठी नवीनच होता.. हे गाव नागपूर जिल्हा परिषदेच्या वेलतूर सर्कल मध्ये येत ..पंचायत समिती पचखेडी....
       समस्या केवळ जीवनापूर किंवा खराडाच्या नाहीत..ह्या गावान  सोबतचा ब्राम्हणी,भिवापूर,पांजरेपार,तुडका कोछी,मारुपर ह्या नागपूर जिल्ह्यतील गाव देखील नरक यातना सोसत आहेत...मागील २५ वर्षांपासून या गावकर्यांचा लढा सरकार सोबत सुरु आहे...त्यामुळे या गावातील लोकानी आता आरपारची लढाई सुरु केली आहे...प्रशासन साध लक्ष देत नाही म्हणून त्यांनी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकी वर बहिष्कार घातला होता आणि ते येणाऱ्या प्रत्येक लोकशाही च्या निवडणूक सणावर बहिष्कार घालणार आहेत...सरकार जे काही निर्णय घेईल तो सरकारने लवकर घ्यावं...मात्र  तो पर्यंत या गावाचा वाली अद्याप तरी  कुणीही नाही.. कारण शेवटी या गावकऱ्यांच जीवन ही पाण्याच्या अवतीभवतीच फिरतंय...

Comments