देव मनुष्यात आहे, माणसाच्या माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...
बाबा आणि भक्तांची जोडगोडी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बघायला मिळते. अशात काही बाबांच सो कॉल्ड चमत्कारीक व्यक्तिमत्व भुरळ घालणारे असतात. किंबहुना त्यांना तसं प्रस्तुत केलं जात. सध्या देशात स्वतःला जगा समोर प्रेसेंट करण्याच वेगळच फ्याड आलंय. त्यामुळं अध्यात्माचा तिळमात्र संबंध नसलेले बाबा प्रेसेंटेन्शन आणि सेल्फमार्केटिंग मध्ये लागले आहे. सर्वच बाबा असे आहेत असं नाही, मात्र त्यांची संख्या कमी देखील नाहीच. मात्र, एखाद्या बाबाचं बिंग फुटल्या नंतर देखील भक्तांची बाबा प्रती असलेली श्रद्धा हि अंध आहे. आणि मग हीच अंधश्रद्धा हिंसेला प्रवृत्त करते. या हिंसेचे कदापिही समर्थन करता येणार नाही. मात्र, अशी स्थिती निर्माण होण्याला जवाबदार असलेल्या परिस्थिती नक्कीच विचार करायला भाग पाडते. एखाद्या बाबाचा अटके नंतर हिंसा होण्याची अनेक उदाहरण आहेत. मग संत रामपाल असो वा नुकतीच अटक झालेल्या गुरमीत राम रहीम च उदाहरण असो. यात हिंसेच्या घटनेत एक बाबतीत बरेच साम्य आहे. ते म्हणजे, हिंसेत झालेली जीवितहानी.. ज्यांनी आपले प्राण गमावले ते एकतर अंधश्रद्धाळू भावीक असतात किंवा भाविकांच्या हिंसेत आपले...