Posts

मोदींच मांडलिकत्व

     उत्तर प्रदेश हेच एक लक्ष ११ मार्च व नंतर पुढच्या राजकीय कारकिर्दी करीता मोदी आणि शहा यांच्या जोडीने ठेवले असावं किंबहुना आत्ता च्या राजकीय हालचाली वरून तसंच समीकरणा वरून हे चित्र सर्वसामन्यां समोर उभं राहत आहे. त्यातच  मोदींच्या सावलीने अर्थातच अमित शहा यांनी या पाच राज्यांच्या विशेषता उत्तर प्रदेशची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. कदाचित या निवडणुकीच्या निकाला नंतर अमित शहा यांचे दिल्लीतील वास्तव्य समोर देखील राहील (राष्ट्रीय अध्यक्ष पद)कि त्यांच्या कडे गुजरातची जबाबदारी येणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे या सर्व परिस्थिती अगोदर हवे तितके राज्य बादशाहच्या पदरी मांडलिकत्वाच्या संकल्पने नुसार टाकण्याचे कामाला शहा लागले असावेत.  आत्ता मांडलिकत्वाचा थेट संबंध इतिहासाशी आहे. तत्कालीन काही राजवटींनी मोगलांचे तसेच ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. संरक्षण पुरवण्याचे काम मांडलिकत्व स्वीकारणाऱ्या राजवटींना देण्याचे काम मोगल आणि ब्रिटिश करायचे असा काहीसा इतिहास आहे. या मांडलिकत्वाच्या निमित्याने मोगल आणि ब्रिटिश...

चिन्नम्माची राजकीय एक्झिट

     मुख्यमंत्री बनण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शशिकला नटराजन यांचं स्वप्न तूर्तास भंगले आहे. मात्र,आपला विश्वासू चेहरा समोर करून अम्मांन नंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न आत्ता कारागृहात जाण्या अगोदर शशिकला (चिन्नम्मा) करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंगरुळु विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत उत्पन्ना हुन अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी चिन्नम्मा यांची चार वर्षांची शिक्षा कायम ठेवत १० कोटींचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय सध्या तामिळनाडूत सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमी वर आला आहे. त्यामुळे समोरच्या राजकीय डाव-पेच आखण्यात सर्व गट तयारी करत आहेत.एकत्र राहून अम्मांचं स्वप्न पूर्ण करू असे भावनिक आवाहन पन्नीरसेल्वम यांनी केले असले तरी पक्ष एकत्र राहील का असा गंभीर प्रश्न समोर निर्माण झाला आहे.       शशिकला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वा वरून ओ.पी ची हकालपट्टी केल्यामुळे राजकीय संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या विरोधात पक्षातील काही आमदार, खासदार तसेच पदाधिकारी पन्नीरसेल्वम यांच्या गोटात ...

. . . . . . . . . अखेर ओ.पीं च्या मुखातून बंडाचा 'ओ'

    हो मॅडम, हो सर,पक्षाचा आदेश सर्वमान्य,भाऊ बोले तैसा चाले. जनतेने निवडणून दिलेल्या नेत्यांना 'त्यांच्या नेत्यांचे' आदेश पाळावे लागतात. हे 'सर्वश्रुत' आहे. मात्र आदेश न पाळल्या नंतर कसा 'राजकीय भूकंप' होतो याचे एक ताज उदाहरण तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती वरून बघायला मिळत आहे. केवळ एका 'ओ' ने कसे राजकीय समीकरणे बदलू शकतात याचे हे उदाहरण.अर्थातच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते  शशिकला (चिन्नम्मा) विरुद्ध ओ.पन्नीरसेल्वम (ओ.पीं)  च्या राजकीय रस्सीखेच कडे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय इच्छा शक्ती जागी झाल्यामुळे ओ.पन्नीरसेल्वम यांनी पक्षाच्या महासचिव आणि विधिमंडळ दलाच्या नेत्या चिन्नम्मा विरोधात उघड बंड केला. त्यात विरोधकांची फूस देखील असू शकते. मात्र अगोदर पासून व्यक्तीपूजेत अग्रेसर असलेल्या तामिळनाडूच्या जनतेला 'इमोशनल' करून राजकारण सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जयललिता यांच्या विश्वासू (एके काळी जयललितांचा विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली पक्षातून काढलेल्या) चिन्नम्मा या सत्ता केंद्र होऊ बघत आहेत. अम्माच्या निधना नंतर ओ.पी क...
Image
Image
Image
अत्याचार पीडितेची ‘फिनिक्स भरारी’ - आंतरराष्टय स्पर्धेत करणार देशाचे नेतृत्व - समाज आणि विचारांच्या नजरेशी तीची झुंझ सुमेध बनसोड / नागपूर सर्वत्र सुरू असलेल्या ‘आॅलपिंक फिवर’ मध्ये देशाला ‘विजयश्री’ मिळवून देणाºया भारतकन्या पी.व्ही.सिंधू , साक्षी मलिक यांच्यावर कौतुकांचा तसेच बक्षीसांचा वर्षाव होतोय. आंतरराष्टÑीय पातळीवरील स्पर्धेत देशाची मान मुलींनीच राखल्याचा मतप्रवाह पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. त्यामुळे या कन्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र, अस असताना एका यशस्वी बालिके ची ‘फिनिक्स भरारी’ भल्याभल्यांच्या भुवया उंचावणारी आहे हे विशेष.
Image